गडहिंग्लज : कर्नाटक येथील सौंदती धार्मिक स्थळावर सध्या महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनास गेले आहेत. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न अचानक चिघळला आहे. हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना देखील सीमेवर कर्नाटक शासनाकडून आडमुठी भूमिका घेतली जात आहे. यामुळे देवदर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भक्तांना त्रास सोसावा लागत आहे.भक्तांना त्रास झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत न बसता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख नागेश चौगुले यांनी पत्रकातून दिला आहे.
सीमा भागातील लाखो भक्त सौंदत्ती येथील देवीच्या दर्शनास गेले आहेत.यात्रा असल्याने मोठी गर्दी असून त्यांची जबाबदारी कर्नाटक सरकारची आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची शासनाने खबरदारी घ्यावी. या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा इजा झाल्यास मनसे शांत बसणार नाही, असा इशारा पत्रकातून दिला आहे. पत्रकावर प्रभात सांबळे, शिवा मठपती, केम्पान कोरी, सविता सुतार आदींच्या सह्या आहेत.