हलकर्णी : इदरगुची येथे जलजीवन मिशन हर घर जल योजनेचा शुभारंभ सरपंच जनाबाई रेमजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला ही लवकरच योजना मार्गी लागणार आहे.
जलजीवन मिशन योजना ७० लाख ७०३ रुपये खर्चाची आहे.यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ३५ लाख ८६५ रुपये निधी आहे.तर ३ लाख ५० हजार ८७ रुपये लोक वर्गणी असणार आहे. यामध्ये दाबनलिका, पंप हाऊस, पंपिंग मशिनरी आधी कामांचा समावेश आहे. या योजनेमुळे प्रत्येक घरात मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. शुभारंभ प्रसंगी इराप्पा काडापनावर,अनिल खामकर,बबलू रेमजी,रमेश देसाई, राजू भोसले, ग्रामसेवक जगदीश पाटील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.