आजरा : आजरा बसस्थाकाच्या सरक्षण भिंतीचा उंची वाढवा तसेच तोरेचे कूपण लावण्याची मागणी आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यार आली आहे . या बाबतचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापकांना देण्यात आली आहे .
गेल्या काही दिवसात महिला स्वच्छतागृहात अज्ञातने आपला मोबाईल खिडकीत ठेवून शूटिंग करत होता . संध्याकाळच्या वेळेत काही तरुण बसस्थानक परिसरामध्ये चाळे करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यांची दखल घेऊन आगाराने तात्काळ संरक्षण भिंतीची उंची वाढवावी व तारेचे कुंपण करावे,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .या निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार विभागप्रमुख दिनेश कांबळे , समीर चांद, सिताराम पाटील यांच्यासह शिवसैनिकाच्या सह्या आहेत.