श्रीपादवाडी येथे दत्त जन्मोत्सव सोहळा

KolhapurLive

चंदगड
 : श्रीक्षेत्र श्रीपादवाडी येथे बुधवारी दि.७ रोजी दत्त जयंती निमित्त दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार दि.७ रोजी सकाळी ७ वाजता पादुकांवर रुद्राभिषेक, महापूजा दुपारी १२ दत्त दर्शन, नामस्मरण, भाविक भक्तांकडून भजन सेवा सायंकाळी ५ ते रात्री ७ राष्ट्रीय कीर्तनकार सुहास बुवा वझे यांचे कीर्तन, रात्री ७ ते ७.३० दत्त जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद वाटप रात्री ८ ते ९.३० रवळनाथ भजनी मंडळ नागवे यांचे भजन, रात्री ९.३० वाजता पंचक्रोशीतील निमंत्रित भजनी मंडळ यांची भजने, गुरुवार दि ८ रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती. सकाळी १० वाजता पालखी सोहळा, प्रदक्षिणा, गंगापूजन दुपारी १२ वाजता नवसफेड, गाऱ्हाणी, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.