गडहिंग्लज : देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी आणि जैन धर्मातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति एक हजार रुपये दिली जाणारी मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. २००८ पासून केंद्र सरकारकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती ३५ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पसंख्यांक मंत्रालयाने पत्राद्वारे अचानक बंद करण्याचे जाहीर केले आहे. किचकट प्रक्रियेतून जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केल्या असून या निर्णयामुळे नुकसान होणार आहे.केंद्र सरकारने एक प्रकारे विद्यार्थ्यांच्यावर अन्याय केला असून गडहिंग्लज मुस्लिम सुन्नत जामीयत कडून याचा निषेध करण्यात आला आहे.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे शिक्षणास हातभार लागण्यासाठी बंद केलेली शिष्यवृत्ती तातडीने पूर्ववत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर प्रा.आशपाक मकानदार, राजूभाई खलीफ, रसिक पटेल, घुडूलाल शेख, रमजान अत्तार, नदीम बाबा शेख, मंजूर मकानदार, युनूस नाईकवाडे, मुस्ताक मुल्ला, सलीम खलिफ, शाहरुख मुल्ला आदींच्या सह्या आहेत.