गडहिंग्लज : वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धात येथील संभाजीराव माने जूनियर कॉलेजच्या खेळाडूने चांगले यश मिळवले. या सर्व खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडू सानिका गुजकर ४०० मीटर धावणेत प्रथम,२०० मीटर धावणेत द्वितीय, लांब उडीत तृतीय, साक्षी चौगुले हिने उंच उडी, थाळीफेकमध्ये दुतीय शेखर उबारे, संकेत अर्धाळकर, धैर्यशील गोडसे ,आशिष पाटील ,रोहन चौगुलेने १०० मीटर रिलेमध्ये प्रथम ,४०० मिटर रिले मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. शिवराज विद्या संकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचे अभिनंदन केले. सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ऍड. दिग्विजय कुराडे, प्रा. डॉ . एस .एम .कदम यांचे प्रोत्साहन, तर पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले व क्रीडाशिक्षक जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.