गडहिंग्लज : श्री गणेश भक्त मंडळ गडहिंग्लज यांच्या वतीने दि.१६ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधी श्रींच्या पालखीसह पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ज्या भक्तांना पायी दिंडी सहभागी व्हायचे आहे त्यांनी दि.१० जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी.
गेली आठ वर्षे श्री गणेश भक्त मंडळातर्फे गडहिंग्लज ते गणपतीपुळे अशी पायी दिंडी काढण्यात येते. यंदाही दिंडी १६ ते २५ जानेवारी या कालावधीत काढण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र साळवी, सचिव डॉ. चंद्रकांत तिकोडे, संचालक विनायक पाटील, अर्जुन मगदूम यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.
दिंडीचा कार्यक्रम असा (मुक्काम व रात्रीचे जेवण) सोमवारी दि.१६ जानेवारी - मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, निपाणी, दि.१७-भगवती मंगल कार्यालय, गोकुळ शिरगाव, दि.१८-श्री गणेश मंदिर, आंबवडे ग्रामपंचायत इमारत,दि.१९- श्री.अशोकराव माने पॉलीटेक्निक, सावे ता. शाहूवाडी, दि.२०- श्री साई मंदिर, आंबा, दत्तात्रय भोसले, दि.२१- दिलीप मालप, दाभोळे यांचे घर, दि.२२ गुरुवर्य अ. आ. देसाई विद्यामंदिर, हातखंबा, दि.२३- श्री देव रामेश्वर व श्री देव कालिका मंदिर भक्तनिवास, काळबादेवी, (रत्नागिरी) दि.२४- भक्तनिवास देवस्थान ट्रस्ट, गणपतीपुळे, दि.२५- गणपतीपुळे येथून सकाळी गडहिंग्लज कडे परतीचा प्रवास.