चंदगड, ता. २५ : हलकर्णी ( ता. चंदगड ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या यश स्पोर्टस् ॲकॅडमीचा विद्यार्थी विक्रम पाटील याने कऱ्हाड येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला . ९७ किलो वजनी गटात त्याने हे यश संपादन केले.
क्रीडाशिक्षक अर्जुन पिटूक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे मार्गदर्शन गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी.डी.अजळकर, प्रशासकीय प्रमुख प्रशांत शेंडे, जी. जी. नाईक यांनी अभिनंदन केले.