चंदगड मोरेवाडी दूध संस्थेत सव्वा लाखाचा अपहार

KolhapurLive

चंदगड : मोरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री रवळनाथ सहकारी दूध संस्थेमध्ये तत्कालीन सचिव तातोबा जोतिबा अमृतकर व अध्यक्ष मल्लू बाबु गावडे यांनी संगणमताने १ लाख १४ हजार ५९९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. संशयित अमृसकर व गावडे यांनी २१ नोव्हेंबर २०२० ते ३१ नोव्हेंबर २०२० या कालावधीत कार्यकाळ संपलेला असताना सुद्धा संस्थेच्या खात्यावरील २ लाख १२ हजार ३०० रुपये काढले. यापैकी काही रक्कम दूध बिले व अनामत खर्ची दाखवली. रोजकिर्दीला दिसणारी शिल्लक रक्कम १ लाख १४ हजार ५९९ रुपये नूतन सचिव खंडेराव अमृसकर यांच्याकडे जमा करणे गरजेचे असताना तसे न करता स्वतःचे फायदा करता वापरली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लेखापरीक्षक चंद्रकांत दाणी यांनी ही फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हेड कॉन्स्टेबल सुतार तपास करीत आहेत.