कोंबड्या वाहतुकीच्या गाडीत सापडली दारू

KolhapurLive


चंदगडमधील वाघोत्रेत कारवाई ; एकास अटक

गडहिंग्लज, ता. २३ : कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात गोवा बनावटीची दारू आढळली. राज्य उत्पादन शुक्ल विभागाने वाघोत्रे (ता. चंदगड) येथे कारवाई करीत ४८ हजार रुपयांच्या दारूसह चारचाकी वाहन जप्त केले. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गजानन महादेव गिलबिले  (वय ३३,रा.बुजवडे, ता. चंदगड) याला अटक केली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुक्ल विभागाने बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर  करडी नजर ठेवली आहे.  तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच तपासणी पथकेही तयार केली आहेत. दरम्यान, वाघोत्रे - इसापूर रस्त्यावर गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहन आढळले. कोंबड्यांची वाहतूक करणारी ही गाडी होती. त्याची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे १० बॉक्स आढळून आले. या दारूसह गाडी जप्त केली आहे.