गडहिंग्लज : गडहिंग्लज ची सुकन्या व सुपर-अभिनव सायन्स अकॅडमी च्या क्रॅश कोर्स ची स्पेशल विद्यार्थिनी रिशेल बारदेस्कर हिची एनडीए वायुसेना केडर साठी निवड झाली. तिने यूपीएससी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली त्याचबरोबर SSB ( पाच दिवसासाठी मानसशास्त्रीय चाचणी) आणि पायलट अभियोग्यता चाचणी एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
रिशेलने भारतातील 67900 विद्यार्थ्यांमध्ये 33 वा आणि मुलींमध्ये सहावा क्रमांक मिळवला. भारतीय वायुसेनेसाठी, देशात मुलींमध्ये तिसरी आली. या उत्तुंग यशाबद्दल सुपर-अभिनव सायन्स अकॅडमी तर्फे रिशेलचा सत्कार समारंभ 26 डिसेंबर रोजी अकॅडमी मध्ये पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रा एस बी पाटील, डॉ. अमोल पाटील, रिशेल चे आजोबा बस्तू बारदेस्कर तसेच अकॅडमी मधील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.