गोकुळच्या २५ लाख संकलनासाठी आमदार मुश्रीफ यांची अजून एक म्हैस खरेदी

KolhapurLive



  कागल आमदार हसन मुश्रीफ यांनी हरियाणामधून दुसरी म्हैस आणून दिलेली शब्दपूर्ती केली.याआधी चार महिन्यांपूर्वी त्यांनी पहिली म्हैस घेतली होती. गोकुळ दूध संघाचे संकलन वाढविण्याच्यादृष्टीने नेतेमंडळी संचालक कर्मचाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी म्हशी घेण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता . त्याची सुरुवात स्वतः पासूनच केली असल्याचे त्यांनी सांगितले.
      वाढते तापमान व लंपी रोगामुळे जागतिक पातळीवर दूध उत्पादन मध्ये 12 टक्के घट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे दूध संकलनावरही याचा परिणाम झाला आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाची २५ लाख लिटर विक्री होऊ शकते .परंतु ; गोकुळ दूध संघाचे संकलन १२ लाख लिटरवर आहे. कोणत्याही परिस्थितीत पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असले तर जिल्ह्यात दूध उत्पादक वाढ होणे आवश्यक आहे.
       आमदार मुश्रीफ म्हणाले गोकुळचे दूध उत्पादकाची संख्या पाचलाखावर आहे त्यापैकी चौथाई  म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक - एक म्हैस जरी घेतली तरी जिल्ह्यात दूध उत्पादकामध्ये दहा ते बारा लाख लिटरने वाढ होईल २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सहज गाठू शकतो. चार महिन्यापूर्वी संचालक मंडळाच्या उपस्थितीत आम्ही दूध वाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी संकल्प सोडला होता की नेत्यांनी व संचालकांनी प्रत्येक दोन म्हशी घेतल्या पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे . शेतकऱ्यांनी एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे त्यासाठी केडीसीसी बँक अर्थसहाय्य करील व गोकुळ जास्तीत जास्त अनुदान देईल. यावेळी केडीसीसीचे प्रताप उर्फ भैय्या माने, नितीन दिंडे, सतीश घाटगे आदी उपस्थित होते.