टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत. टीम इंडियाने आजच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये एक बदल केला आहे. दीपक हुड्डा ऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने ८ चेंडूवर २धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने
विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.