पुष्पनगर गावच्या सर्वांगीण विकासासाठी कठिबध्द – केडीसीसी संचालक अर्जुन आबिटकर 2 कोटी 12 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

KolhapurLive

पिंपळगाव वार्ताहर,
मतदारांनी आपणास 2 वेळा पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहिलो आहे. जनहिताची कामे करताना गट-तटाचा विचार केला नाही. यातूनच पुष्पनगर गावात कोट्यांवधींची कामे केली असून यापुढे देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी दिली.

तरी आमदार प्रकाश आबिटकर व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्य 2 कोटी 12 लाख रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की, राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही. पुष्पनगर गावच्या सर्वांगिक विकासासाठी आबिटकर कुटूंब सैदैव तत्पर आहे यामुळे पुष्पनगर ग्रामपंचायत हद्दीतील कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. नागरिकांशी निगडित राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या गावचा सर्वांगिक विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी गोकूळचे माजी संचालक बाबा देसाई, जि.प.सदस्य रोहिण आबिटकर, माजी सभापती सुनिल निंबाळकर, सरपंच आर.बी.देसाई, उपसरपंच राजेंद्र देसाई, माजी पं.स.सदस्य जयवंत चोरगे, दिनकरराव चव्हाण, लक्ष्मण सुतार, धोंडीराम खोपडे, रणजित माडेकर, जी.बी.खांडेकर, डी.आर.शिंदे, अविनाश कालेकर, सुरेश देसाई, पांडूरंग कडव, अमोल कांबळे, निलेश देसाई, शशिकांत गुरव, धनाजी डांगे, शिवाजी वळीवडे, संतोष शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ्‍ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक के.ए.देसाई यांनी केले तर आभार शिवाजीराव चोरगे सर यांनी मानले.

फोटो : घंटागाडी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करताना रोहिणी आबिटकर उपस्थित सरपंच आर.बी.देसाई, उपसरपंच राजेंद्र देसाई, शिवाजीराव चोरगे, सुरेश देसाई आदी मान्यवर.