राज्य परिवहन महामंडळाने बसेस शेवटच्या ठिकाणापर्यंत सोडण्याची मागणी

KolhapurLive



महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बसेस कर्नाटकच्या हद्दीपर्यंत न सोडता इस्पित ठिकणापर्यंत बस सेवा सुरू ठेवून प्रवासांची गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
      
      अनेक वेळा सीमा सीमाप्रश्न एखादा कर्नाटक नेता काहीहीतरी बरळतो . त्यामुळे अकारण दंगली घडतात. काही सरकारी गाड्यांची तोडमोड होते . आणि घाबरून राज्य परिवहन महामंडळ आपल्या बसेस कर्नाटकच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवते . तेथून पुढचा प्रवास करणे प्रवाशाना अवघड जाते.  खाजगी गाड्या भाड्याने घेऊन पुढील प्रवास करावा लागतो .त्यामध्ये वेळबरोबरच आर्थिक नुकसान ही सोसावे लागते .मात्र दुसरीकडे कर्नाटक राज्य परिवहनाच्या गाड्या बिनधास्तपणे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी पर्यंत कितीही कठीण प्रसंग आला तरी चालू राहतात. कर्नाटक परिवहन परिणामना घाबरत नाही. मात्र  महाराष्ट्र राज्य परिवहन किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा बस सेवा बंद ठेवून आपले नुकसान करून घेतानाच प्रवाशांची ही गैरसोय करत आहे . एक तर गाड्यांचे इन्शुरन्स असतो . मोडतोड झाली तरी विमा कंपनी आपले झालेली भरपाई देऊ शकते किंवा हे टाळण्यासाठी  प्रत्येक गाडीसमोर सीसीटीव्हीची व्यवस्था केल्यास मोडतोड करणाया व्यक्ती सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊन सापडू शकतात .त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे भरपाई वसूल करता येऊ शकते हे असताना सुद्धा गाड्या बंद ठेवून शासनाचे नुकसान केले जात आहे

  यापुढे कोणत्यही किरकोळ कारणासाठी राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बसेस सीमेनं थांबवता न थांबवता शेवटच्या निश्चित ठरलेल्या ठिकाणापर्यंत बसेस चालू ठेवाव्यात ,अशी मागणी प्रवाशातून होत आहे.