गडहिंग्लज : येथील कडगाव मार्गावरील फिजिक जिमचा बुधवारी (ता.३०) तिसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .सकाळी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, तर सायंकाळी स्नेहमेळावा होणार आहे.सध्या असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता तरुणांनी रक्तदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन फिजिक जिमने केले आहे. तीन वर्षापूर्वी स्थानिक स्तरावर तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शनासाठी फिजिक जिमची सुरुवात झाली. शरीरसौष्ठवपटू भारतश्री संग्राम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिम सुरु आहे. आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सर्वच प्रकारच्या व्यायामप्रकाराची याठिकाणी सुविधा आहे. झुंबा , स्ट्रेचिंग, ॲंप ,योगा क्रॉसफिट ,फंक्शनल , फॅंट लॉस , वेट गेन आदीचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते . त्यामुळेच अल्पावधीत या जिमकडे तरुणासह व्यायामप्रेमींचा कल वाढला आहे. होतकरु फुटबॉलपटूंसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग दिले जाते. सकाळी दहा वाजता चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल . सायंकाळी जिमच्या सर्व सदस्यांसाठी स्नेहमेळावा होणार आहे . तरुणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बापू नदाफ, सिडनी विल्यम्स आणि सहकाऱ्यांनी केले आहे.