कौलगेचा युवक राष्ट्रीय महामार्गावर अपघातात ठार

KolhapurLive


निपाणी : येथील  पुणे बेंगरूळ राष्ट्रीय महामार्गावरील म. गांधी रुग्णालयानजीक दुचाकी झाडावर आदळल्याने झालेला अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रोहित चंद्रकांत आरदाळकर ( वय ३४ , रा . कौलगे. ता. गडहिंग्लज ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
           याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की , दुचाकीवरून रोहित हा गडहिंग्लज येथून कोल्हापूरच्या दिशेने जात होता .दरम्यान निपाणीतील गांधी रुग्णालयातजवळ आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी झाडावर जाऊन आदळली. यामध्ये त्यांच्या डोक्यातील रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळतात शहर फौजदार कृष्णवेणी गुलहोसूर, हवालदार गस्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी या रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर त्यांचा मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी बघयांची मोठी गर्दी झाली होती रोहित हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा असल्याने कौलगे गावात शोककळा पसरली. रोहितच्या पश्चात आई-वडील बहिण असा परिवार आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात  झाली आहे. अधिक तपास निपाणी पोलीस करीत आहेत .