संत गजानन मध्ये मेंदू विकार रुग्णावर उपचार

KolhapurLive
महागाव: येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल मध्ये आता मेंदू विकार रुग्णांवर निदान व उपचार होणार आहेत. प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर सागर जाबीळकर हे दर शुक्रवारी रुग्ण तपासण्यासाठी हजर असणार आहेत. यामध्ये मेंदूच्या गाठी व रक्तस्त्राव मणक्याचे विकार फिट व रक्तवाहिन्यांच्या अन्य विकारावर उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य व कर्नाटकचे सुवर्ण आरोग्य सुरक्षा योजनेतून मोफत होणार आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी केला आहे.