दौलत कारखान्याची नागपूरच्या कंपनीकडून पाहणी : सोमवारी बैठक

KolhapurLive

चंदगड, ता. २ : हलकर्णी  ( ता. चंदगड ) येथील दौलत कारखाना सोडण्यासंदर्भात अथर्व  इंटरट्रेड कंपनीने घोषणा केल्याने आज नागपूर येथे एका कंपनीने कारखान्याची पाहणी केली. शेतकरी आणि कामगाराच्या सहकार्याने आपण हा कारखाना चालवू,असे आश्वासन त्यांनी दिले. कारखाना कार्यस्थळावर शेतकरी,कामगारसमोर बैठक घेऊन त्यांनी हे आश्वासन दिले.
    
    जिट्टेवाडी (ता: चंदगड ) येथील डॉ जी.एस.पाटील यांच्या सहकार्याने या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याची पाहणी  केली. त्यानंतर कामगार, शेतकऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. तानाजी गडकरी, नितीन पाटील,विष्णू गावडे, भरमाणा गावडे, पांडुरंग बेनके, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, अशोक गावडे, दिलीप कदम,हनुमंत पाटील, निवृत्ती चौकुळकर, उपस्थित होते. दरम्यान, संघटनेतर्फे उद्या ( ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दौलत चा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात येणार होते. संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय दे वणे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उद्यापासून तीन दिवस राज्यपालांचा  जिल्हा दौरा असल्याने  यासंदर्भात दौलत संघर्ष समिती आणि दौलतशी संबंधित सर्व घटक, जिल्हा बँक, साखर सहसंचालक, कामगार आयुक्त यांनी सोमवारी (ता. ७) दुपारी दोन वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेण्याबाबत मान्य केले. या बैठकीला सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदीप पवार यांनी केली.