उत्तुर: मुुमेवाडी (ता आजरा) येथे मंगळवारी रात्री आठ ठिकाणी घरपोडी झाली. बंद असलेल्या घरांची कुलूप फोडून चोरट्याने घरात प्रवेश केला चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तांब्या पितळेची भांडी पळवली.
जैनबी शौकत खलीप त्यांच्या घरातील 40 हजारांचा मुद्देमाल व 32 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेले. निवृत्ती कांबळे, अशोक कांबळे, कासूबाई कांबळे, तायाप्पा ढोणुक्षे, दत्ता भियुंगडे, जनार्दन सुतार, निवृत्ती जाधव यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला आहे. जैनबी खलीप यांनी पोलिसात तक्रार दिली. चोरट्यांनी या परिसरामधल्या बंद असलेल्या घरांना लक्ष्य केले आहे. बहिरेवाडीत रविवारी रात्री पाच ठिकाणी घरपोडी झाली होती. या गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या मुमेवाडीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरांचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. पुढील तपास सहाय्यक फौजदार बीएस कोचरगी करत आहेत.
चोरट्यानी गावातील प्राथमिक शाळेजवळ असलेल्या निवृत्ती जाधव यांच्या सलून दुकानात चोरी केली. वस्तारा, कात्री व सलूनचे साहित्य पळवले. काही घरातून महिलांच्या नवीन साड्या चोरीस गेल्याची घटनास्थळी चर्चा होती.