गिजवणेत कायदेविषयक शिबिर

KolhapurLive

गडहिंग्लज:गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मोफत विधी सल्ला व सेवा पुरवण्यासाठी भिजवणे येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. पक्षकारांचा आर्थिक भुर्दंड, शारीरिक व मानसिक त्रास वाचवण्यासाठी तसेच वैवाहिक व अन्य प्रकरणात वाद मध्यस्ती व समेट पद्धतीने मिटवून कायद्याबाबत साक्षरता निर्माण करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश अतुल उबाळे, एडवोकेट शीतल साळवी, एस आर कांबळे, संदीप उंडाळे, सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, भूषण गायकवाड, अमित देसाई, शिल्पा पाटील, अन्नपूर्णा नाईक, शशिकला पोडजाळे संतोष चव्हाण, तमान्ना पडदाळे, शीतल पाटील, अली खान पठाण, महादेव कुंभार, अभिनंदन पाटील, निर्मल पाटील, डॉक्टर माने, चंद्रकांत लष्करे, उदय कडूकर आदी उपस्थित होते.