डॉ. घाळी महाविद्यालयात प्रथमोपचारवर कार्यशाळा

KolhapurLive

 गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालय शिवराज प्रमुख अग्रणी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार या विषयावर कार्यशाळा झाली. स्वागत डॉ.आर. एस.सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी  डॉ.प्राचार्य मंगलकुमार पाटील होते. यावेळी केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली शुक्ला आणि डॉ. अमोल जाधव यांनी दैनंदिन जीवनात घडणारे वेगवेगळे अपघात आणि अशावेळी प्रथमोपचार कसे करावे, त्याची माहिती दिली. प्रास्ताविक  डॉ.सरोज बिडकर यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय वाघमारे यांनी मानले.