IND vs NZ 1st ODI Report: 306 धावा करुनही टीम इंडिया पहिल्या वनडेमध्ये हरली

KolhapurLive
ऑकलंड: T20 सीरीज जिंकणाऱ्या टीम इंडियाची वनडे मालिकेत पराभवाने सुरुवात झाली आहे. आज ऑकलंडच्या ईडन पार्कवर टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना खेळला गेला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली. त्यांनी 7 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 50 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 7 विकेट गमावून 306 धावा केल्या. यजमान टीमने 47.1 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं.