१५ तारखेपर्यंत आजरा कारखान्याची बिले जमा

KolhapurLive

      आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप झालेल्या ४९ , २४३ , ४५९ मे . टन उसाची ३ हजार मे. टन प्रमाणे होणारी रक्कम १४ कोटी ७७ लाख इतकी ऊस बिल विनाकपात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती चेअरमन सुनील शिंत्रे यांनी दिली.
     
         आजरा कारखान्याला आज अखेर २५ दिवस  ७५ , २७०  मे . टन उसाचे गाळप करून सरासरी ९. ७० टक्के साखर उताऱ्याने  ७१. ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.  हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याचे ४.५ लाख मे. टन ऊस गळापाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याकरिता पुरेशी बीड व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणा ऊस तोडणीकरिता कार्यरत ठेवली असल्याचे शिंत्रे यांनी सांगितले कार्यक्षेत्रामध्ये पाळीपत्रकानुसार ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे . सर्व शेतकऱ्यांच्या कारखान्याकडे नोंदवलेला संपूर्ण ऊस नियोजनपुवक गाळप करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखाना कारखान्याकडून आलेल्या उसाची बिल 3000 प्रमे टन प्रमाणे बिना कपात एक रकमेवर तोडणी वाहतूक विले ही नियमितपणे वेळेवर अदा करण्याचे नियोजन केले आहे.
         यावेळी संचालक मुकुंद देसाई, दिगंबर देसाई, संचालिका अंजनाताई रेडेकर , सुनीता रेडेकर , संचालक मारुती घोरपडे ,मधुकर देसाई , जनार्दन टोपले, राजेंद्र सावंत,  मलिकुमार बुरुड , यांच्यासह सहकार्य संचालक डॉ. टी .ए .भोसले जनरल मॅनेजर व्ही . एच .गुजर , सेक्रेटरी व्ही. के . ज्योती मुख्य शेती अधिकारी एस. एन. व्हरकट , बी एम घोळसे उपस्थित होते.