गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना अध्यक्षपदी बसवराज आरबोळे

KolhapurLive


नूल : गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी तनवडी गावचे सरपंच बसवराज आरबोळे यांची निवड करण्यात आली .पंचायत राज विकास मंचाच्या वतीने सरपंच संघटना कार्यरत असून निवडीचे पत्र राज्य कार्यकारणी सदस्य संजय कांबळे यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व सरपंच मंडळाच्या उपस्थितीत देण्यात आले .तालुकाध्यक्षपदी निवडीबद्दल श्री .आरबोळे  यांचे अभिनंदन होत आहे.