'संत गजानन' हॉस्पिटलचा वर्धापन दिन उत्साहात

KolhapurLive

महागाव, ता. २८ : येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम झाले. या निमित्त झालेल्या मोफत  महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला. मलिग्रे (ता. आजरा) आरोग्य केंद्रातील अशा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब  चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन  व  प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवराच्या हस्ते धन्वतंरी मूर्तीचे पूजन झाले. या वेळी ॲड. चव्हाण म्हणाले,  "रुग्णालयांमध्ये आयुर्वेद व आधुनिक उपचार पद्धतीची  सांगड घालून रुग्णालयात वर्षभरात हजारो रुग्णांनी उपचार घेऊन आनंदी जीवन जगत आहेत." या वेळी डॉ. यशवंत चव्हाण,  डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण,  सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण,  डॉ. मंगल मोरबाळे,  डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. एस. एच. सावंत, प्रा. डी. बी. केस्ती,  डॉ. अन्सार पटेल, डॉ. माधव  पताडे,  डॉ. राजदीप होडगे, डॉ‌. प्रीती पाटील, डॉ. भगवान उपस्थित होते.