डॉ.घाळी महाविद्यालयात "सायबर सुरक्षे"वर कार्यशाळा

KolhapurLive
गडहिंग्लज : डॉ घाळी महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागाच्या वतीने सायबर सुरक्षा यावर कार्यशाळा पार पडली. डोमेन कॉम्प्युटरचे एम. आर.पाटील यांनी वेब टेक्नॉलॉजी, सायबर क्राईम, सोशल मीडियातील गोपनीयता, इंटरनेट बँकिंग,डिजिटल पेमेंट, मोबाईल पेमेंट, मोबाईल फोन सुरक्षा, डेटा बॅकअप, वाय-फाय सुरक्षा, अँटीव्हायरस सायबर हल्ला, ऑनलाइन जॉब फ्रॉड, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा याविषयी माहिती दिली.प्रा.राधिका हुलगबाळी, प्रा. पी.एस. कुलकर्णी, प्रा.पौरवी पाटील, प्रा. अंकिता चोपडे यांनी मार्गदर्शन केले.प्राचार्य मंगलकुमार पाटील यांचे कार्यशाळेला प्रोत्साहन लाभले.