गडहिंग्लज :शहरातील संकल्पनगर येथील चैतन्य कुराडे आणि भाऊसाहेब आंबुलकर यांची राज्यसेवा परीक्षेतून विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. चैतन्य यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथे झाले असून त्यांनी इस्लामपूर येथून बीटेक पदवी मिळवली. स्पर्धा परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असून वर्ग १ साठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. चैतन्य यांचे वडील विष्णू कुराडे शहरातील काळू मास्तर विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत.
भाऊसाहेब आंबुलकर यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज शहरात झाले. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचे सांगत असताना अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांनी वर्ग १ पदासाठी पुढील परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
भाऊसाहेब यांचे वडील शहरातील बॅरिस्टर पै. विद्यालयात शिक्षक म्हणून काम पाहत आहेत. एकाच वेळी दोन प्राथमिक शिक्षकांच्या मुलांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.