मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडच्या मैदानावर २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी कागल तालुकास्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धा मुला मुलींच्या स्वतंत्र १४,१७आणि१९ अशा तीन वयोगटात होणार आहेत. अशी माहिती प्राचार्य पी. डी. माने, स्पर्धाप्रमुख माजी प्राचार्य महादेव कानकेकर, उपप्राचार्य रवींद्र शिंदे क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे यांनी दिली आहे.
१४ वर्षाखालील मुले- मुली व १९ वर्षाखालील मुले- मुली यांची स्पर्धा २९ रोजी तर १७ वर्षाखालील मुले मुलींची स्पर्धा ३० रोजी होतील. सर्व स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होतील. खेळाडू, क्रीडा शिक्षक व संघ व्यवस्थापकांनी तत्पूर्वी मैदानावर उपस्थित राहावे. आपल्या संघाची नोंद २८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करावी स्पर्धकांनी येताना मूळ आधार कार्ड, प्रवेशिका, फी भरल्या बाबत पावती सोबत असणे आवश्यक आहे.