ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.