महिला सभासदांना रविवारी आजरा अर्बनकडून प्रशिक्षण

KolhapurLive

आजरा,  ता. ३ : येथे दि आजरा अर्बन  को - ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड  ( मल्टीस्टेट ) या बँकेने  आजारा परिसरातील महिला सभासदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजित केले आहे. आजरा हायस्कूलवरील अण्णा भाऊ संस्कृतिक सभागृहात  रविवारी ( ता. ६) सकाळी प्रशिक्षणाला सुरवात होईल. याचे  उद्घाटन कोल्हापूर महिला सहकारी बँक अध्यक्ष  सौ.शैलजा सूर्यवंशी  यांच्या हस्ते होईल. संभाजी जाधव, प्रशांत गंभीर मार्गदर्शन करणार आहे . सहकारातून महिला सक्षमीकरण, सभासदाचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या , आर्थिक जागरूकता हे विशेष आहे.