गडहिंग्लज येथे शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन व गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यावतीने शनिवार दि. 5 नोव्हेंबर पासून वरिष्ठ गट महिलांसाठी "राजमाता चषक २०-२०" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्यांना चषक व आकर्षक बक्षिसे तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, विकेट किपर, क्षेत्ररक्षक म्हणून वैयक्तिक कामगिरीबद्दल गौरवण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, बेळगाव व तालुका असोसिएशनच्या संघांचा सहभाग असणार आहे. अंतिम सामना कोल्हापूर येथील शास्त्रीनगर मैदानात होणार असून याचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चैनल वर होणार आहे. इच्छुक संघाने संपर्क साधावा, असे आवाहन मिलिंद कोरी यांनी केले आहे. स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.