प्रणिती शिंदे म्हणाले, “संभाजी भिडे आणि भाजपाचे लोक महिलांचं वस्तूकरण करत (ऑब्जेक्टिफिकेशन) करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. ते प्रत्येक महिलेला एक वस्तू म्हणून बघतात. महिलेने काय घालावं, तिने कसं वागावं हे सांगणारे हे लोक कोणी नाही. आमची संस्कृती, देशप्रेम आमच्या ह्रदयात आहे. ते आम्हाला कोणालाही दाखवायची गरज नाही. ही गरज ना महिलांना आहे, ना पुरुषांना.”
“महिलेने कसं वागावं हे सांगायचा त्यांना अजिबात अधिकार नाही”
“कोणी काय घालवं, कोणी काय केलं तर जास्त देशप्रेम हे आम्हाला शिकवू नका. त्यांचं पक्षप्रेम आहे, आमचं खरं देशप्रेम आहे. एका महिलेला काय घालावं आणि कसं वागावं हे सांगायचा त्यांना अजिबात अधिकार नाही. महिलांचं वस्तूकरण सुरू आहे ते त्यांनी ताबोडतोब बंद करावं. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो,” असं मत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलं.
“…म्हणूनच भाजपा शासनात महिलांवर अत्याचार होतात”
“मानसिकेत बदल नव्हता, महिलांचं वस्तूकरण होतं म्हणूनच भाजपा शासनात महिलांवर अत्याचार होतात. ते महिलांचे काम, कर्तुत्व बघत नाहीत, फक्त चेहऱ्यावर जातात. त्यांना वस्तू म्हणून बघितलं जातं आणि महिलांवर अत्याचार करतात,” असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यावेळी केला.