अथर्व - दौलत कारखान्याकडून १५ नोव्हेंबरअखेरचे बिल जमा

KolhapurLive


चंदगड, ता . २३ हलकर्णी ( ता. चंदगड ) येथील दौलत - अथर्व कारखान्याकडे १५ नोव्हेंबर अखेर गाळपाला आलेल्या उसाचे बिल संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अथर्व इंटरट्रेंड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खराटे यांनी ही माहिती दिली.
         
            कंपनीकडून कारखान्याचे चौथा गळीत हंगामा आहे . तीन वर्ष उसाचे बिल कामगारांचे पगार आणि तोडणी वाहतुकीदारांचे बिल वेळेत देऊन कंपनीने विश्वास संपादन केला आहे .यावर्षी  एफआरपीपेक्षा जादा दर निश्चित केला आहे .प्रतिटन  ३००१ रू . प्रमाणे बिले  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचेही खोराटे यांनी स्पष्ट केले . यावर्षीही आठ दिवसात बिले जमा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे . इंजीनियरिंग ,उत्पादन , शेती  विभाग आणि कामगारांकडून योग्य नियोजन केले आहे. 
            
         ऊस उत्पादक तोडणी - वाहतूक यंत्रणा आणि कामगारांच्या विश्वासाच्या जोरावर सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे, असे आव्हान संचालक पृथ्वीराज खराटे ,विजय पाटील, युनिट हेड ए . आर . पाटील , सचिव विजय मराठे यांनी केले .