उत्तूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून योजना हाती घेतली आहे.योजनेअंतर्गत हालेवाडी( ता.आजरा)दुर्गामाता दूध संस्थेत सभासदांना कार्ड वाटप झाले. केंद्र सरकारच्या स्वावलंबी (आत्मनिर्भर) धोरणांतर्गत शेतीसह दुग्ध व्यवसायास अल्पमुदतीचा खेळते भांडवल कर्जपुरवठा किसान क्रेडिट कार्डवर होत आहे. दूध संघ दूध उत्पादक कंपन्यांचे संलग्न शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करून देण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येत आहे. अमर तुकाराम पाटील,प्रकाश यशवंत पाटील,लता आनंद जाधव, शामराव अंतू पन्हाळकर, सुरेश जनार्दन पन्हाळकर, सुशीला तुकाराम पाटील, वसंत महादेव पाटील,अशोक गणपती कांबळे, वसंत भैरू खवरे दूध उत्पादकांना कार्ड प्राप्त झाले.
तीन टक्के दराने कर्ज
दूधसंस्था सभासदांना बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्डचे वाटप होईल. कार्ड असलेल्यांची कर्ज मर्यादा वाढवली जाईल. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वृद्धीसाठी तीन टक्के व्याजदर आणि कर्ज दिली जाणार आहे.