हलकर्णी : अरळगुंडी येथे शनिवारी दि.३ ते सोमवारी दि.५ अखेर श्री विठ्ठल नाम सप्ताहाच्या आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे सहा वाजता श्री हनुमंतरायास महाअभिषेक व त्यानंतर गाथा पूजन प्रतिमा पूजन केले जाणार आहे. रोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी गाथा पारायण तर सायंकाळी प्रवचन व किर्तन होणार आहे. शनिवारी ह.भ.प. मारुती पवार (अंकली)यांचे प्रवचन व किर्तन होणार आहे. रविवारी ह. भ.प. किरण खटावकर (संकेश्वर )यांचे प्रवचन व किर्तन होणार आहे. सोमवारी सकाळी ह.भ.प. मारुती घोरपडे (नांगनुर) यांचे काल्याचे किर्तन होईल. यानंतर महाप्रसादांनी सोहळ्याची सांगता होणार आहे. सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल नाम सप्ताह कमिटी अरळगुंडी व ग्रामस्थांनी केले आहे.