गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्णव बुवा याने शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पंडिता शुभा मुदगल यांच्या हस्ते अर्णवला सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किशनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ . एस.एम. कदम , उपाध्यक्ष ऍड दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन मिळाले.