गडहिंग्लज : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) अंतर्गत वरिष्ठ गटात यावर्षी विक्रम १९ खेळाडूंनी दहा संघातून नोंदणी केली आहे. यंदा परदेशी आणि परजिल्ह्यातील फुटबॉलपटू येऊनही गडहिंग्लजकरांचा भाव टिकून राहिला. गेल्यावर्षीपेक्षा दोन खेळाडू वाढल्याने स्थानिक प्रतिभावना खेळाडूंची गुणवत्ता अधोरेखित झाली. यात गडहिंग्लज युनायटेड चे सर्वाधिक सात खेळाडू आहेत. नव्या हंगामात हे खेळाडू कोल्हापुरात कशी कामगिरी करतात याची उत्सुकता आहे.
गेल्या दोन दशकापासून कोल्हापुरातील बहुतांश संघाने व्यावसायिकपणा अंगीकारक जिल्हा, राज्य आणि देशाबाहेरील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मानधनावर सामावून घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून कोल्हापुरात खेळणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली. शकील पाटील, नागेश राजमाने, किरण मोहिते, इम्रान बांदार अशी शंभरहून अधिक खेळाडूंची यादी आहे. विशेषतः शकील ने खंडोबा, प्रॅक्टिस, बालगोपाल अशा संघातून तब्बल दोन दशके चौफेर खेळाणे छाप पडली आहे.
नोंदणी केलेले खेळाडू असे (कंसात संघ) शकील पटेल (पोलीस),निखिल खन्ना (खंडोबा), सचिन बारामती (बालगोपाल) ओंकार जाधव,सागर पवार (प्रॅक्टिस) अक्षय सावंत, यासीन नदाफ, प्रशांत बामणे (सम्राटनगर) आदित्य रोटे(फुलेवाडी),जीवन लुड्रिक (बीजीएम), अमित सावंत, अनिकेत कोले,पवन कंगुरे (ऋणमुक्तेश्वर) रोहित सुतार, विकास जाधव( रंकाळा) सचिन मोरे स्वप्नील तेलवेकर, महेश जगताप( जुना बुधवार) इमरान बांदार ,किरण कावणकर (संध्यामठ)
ग्रामीण खेळाडू
गडहिंग्लज मुळे लगतच्या बेक, वडरगे, गिजवणे, भडगाव, बसर्गे ,कडगाव या गावातही फुटबॉल वाढला आहे. त्यामुळेच या खेळाडूंनी गडहिंग्लजची बेस ओलांडून कोल्हापुरातील संघात नोंदणी केली.बेकनाळचे महेश जगताप आणि विकास जाधव यांना पदार्पण करणार असून, वेडरगेचा सचिन मोरे तिसरा हंगाम खेळतो आहे.