गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेच्या वतीने शहरात प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्लास्टिकचा वापर करणारे व्यापारी आणि नागरिकांच्या वर दंडात्मक कारवाई करत मंगळवारी दिवसभरात १४३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच २५००० दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी दोन पदके नेमली आहेत. या पथकात सहाय्यक मिळकत अधिकारी रवीनंदन जाधव, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, सागर यावरे, शामराव वडर, निखिल बारामती, अभिजीत डोंगरे, रामा लाखे, मारुती कांबळे, संतोष मराठे, राहुल कांबळे आदींचा समावेश आहे.