चंदगड : तुर्केवाडी महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्युत मोटर धारक शेतकऱ्यांनी वीज बिल कमी करून घेण्यासाठी बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता तुर्केवाडी कार्यालयासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. विजयभाई पाटील यांनी केले आहे.
वीज बिल कमी करून घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने शेकाप पक्षातर्फे महावितरणाला निवेदन देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यातील महावितरण च्या सर्व कार्यालयाद्वारे चुकीची बिले देऊन अनागोंदी कारभार सुरू आहे. जूनमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या मोटार बंद करून ठेवले आहेत. त्या अजूनही घरातच आहेत. जून ते नोव्हेंबर असे सहा महिने विद्युत मोटारी बंद असून सध्या दर आठ ते दहा दिवसांनी विद्युत बिल वाढलेले संदेश मोबाईलवर शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या बिलात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांची बिले कमी करून द्यावीत, तसेच या सहा महिन्यांची बिले झिरो करून देण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन केले आहे.