आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

KolhapurLive


आजरा : आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. यानिमित्त आजरा शहरातून रॅली काढण्यात आली. प्राचार्य ए.एन.सादळे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एन.एस.एस. प्रकल्प अधिकारी डॉ. रणजीत पवार यांनी सरदार पटेल यांच्या देश विकासातील योगदान या विषयी माहिती दिली. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी एस. के. चव्हाण यांनी शपथ दिली . यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.