एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री, अशा व्यक्तीच्या…”; संजय राऊतांच्या भावाची शिंदे गटासह फडणवीसांवर टीका

KolhapurLive

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मेळावे सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी विक्रोळी झालेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

भाजपाने कितीही अन्याय केला तरी संजय राऊत बाहेर येतील. आणि भाजपाच्या अन्यायविरोधात उठवण्याचे काम करेल, महाराष्ट्रात पुन्हा एकदा ते शिवसेनेचा आवाज भक्कम करण्याचा प्रयत्न करतील, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली. बंडखोरी नंतर मलाही पैशांची ऑफर होती. ४० गद्दारांपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला आली होती. मात्र, पैशांपेक्षा मला शिवसैनिकांचे प्रेम आणि समर्थन मोलाचे आहे”, असेही ते म्हणाले.

जोपर्यंत भाजपाचे राज्य आहे, असा अत्याचार सुरू राहणार आहे. भाजपाला काहीही झालं तरी सत्ता पाहिजे. १०० पेक्षा जास्त आमदार असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा काही पक्ष नाही, नाव नाही ती व्यक्ती मुख्यमंत्री कशी? एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणताही पक्ष नाही, अशा व्यक्तीच्या नेतृत्त्वात फडणवीस कधीच काम करणार नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेना संपवण्याठी ते काम करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.





🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.