भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या संघांनी
दमदार कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. त्यामुळे त्यांच्याकडून यावेळी
सुवर्णपदकाची अपेक्षा होती. भारताने या फायनची दमदार सुरुवात करत सिंगापूरवर मात केली. त्यामुळे चाहत्यांच्या आशा वाढल्या होत्या.
बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंगापूरवर दमदार विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताकडून हरमीत आणि साथियान यांनी नेत्रदीपक कामगिरी करत सिंगापूरवर ३-१ असा विजय साकारला आणि सुवर्णपदक भारताच्या नावावर केले.
दुसऱ्या सामन्यात भारताचा अचंथा शरथ कमल उतरला होता, पण त्याला पहिल्या गेममध्ये ०७-११ असा पराभव पत्करावा लागला. पण दुसऱ्या गेममध्ये मात्र त्याने दमदार पुनरागमन केले. अचंथाने दुसरा गेम १४-१२ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पण त्यानंतरचे दोन्ही गेम्स त्याने गमावले आणि त्यामुळेच सिंगापूरला भारताबरोबर १-१ अशी बरोबरी करता आली. त्यानंतर हरमीत देसाईने आपला सामना जिंकला आणि सुवर्णपदक पटकावले.
भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये तिसरा सामना एकेरीचा झाला. या सामन्यात साथियाने दमदार सुरुवात करत पहिला गेम जिंकला होता. पण दुसऱ्या गेममध्ये त्याला पराबव पत्करावा लागला. पण त्याने तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर चौथा गेम ११-७ असा जिंकत त्याने सामना जिंकला आणि भारताला २-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर त्याने हा सामना जिंकला आणि भारताला सुवर्णपदकाची आस दाखवली.