विकास ठाकूरने राष्ट्रकुलमध्ये जिंकले सलग तिसरे पदक, रौप्यपदकासह रचला मोठा विक्रम

KolhapurLive

 




बर्मिंगहम : भारताच्या रोहित ठाकूरने राष्ट्रकुल स्पर्धेत मोठा विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताचा वेटलिफ्टर विकास ठाकूरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्या पदकाची नोंद केली आहे.

विकासने आज झालेल्या वेटल्फ्टिंगच्या ९६ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदकाची कमाई केली. विकास ठाकूरने एकूण ३४६ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये १५५ किलो वजन उचलले आणि १९१ किलो वजनासह क्लीन अँड जर्क फेरी संपवली. पण, सामोन डॉन ओपेलोज सुरुवातीपासूनच पुढे होता. त्याने ३८१ किलो वजनाच्या गेम्स रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विकासला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत विकासने रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१८ साली झालेल्या स्पर्धेत विकासने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर आता २०२२ साली बर्मिंगमहमधील स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

भारताने आज झालेल्या स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारताने आज यापूर्वी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. यामधील पहिले पदक हे महिलांनी लॉन बॉलमध्ये भारताला पटकावून दिले, तर दुसरे सुवर्णपदक हे भारताच्या टेबल टेनिस संघाने पटकावले. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. या क्रीडा प्रकारातील देशाचे हे पहिलेच पदक ठरले आहे. ज्या खेळाबद्दल देशातील मोजक्या लोकांना माहिती आहे, अशा खेळात सुवर्ण पदक जिंकल्याचा अभिमान सर्वांना होत आहे. अंतिम सामन्यात भारताने द.आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला होता. त्या सामन्यात भारत १-६ अशा पिछाडीवर होता तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला होता. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेची फायनल खेळणाऱ्या भारतीय संघातील लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सेनिया आणि रुपा राणी टिर्की यांनी शानदार कामगिरी करून मन जिंकली.