धुळेः धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षे तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या हत्येचे कारण समजताच पोलिसही चक्रावले आहेत. पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे. (Dhule Crime News)
पत्नीच्या फोननंतर काही वेळातच चिनू पोपली घराजवळ आल्यानंतर ते तिघेजण परत आले. तेव्हा त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. पण हा छोटासा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी थेट आपल्याजवळील बंदूक काढून चिनू पोपली यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर जखमी अवस्थेत चिनू हा घरी आला व त्याने आपल्या पत्नीला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
चिनू पोपली यांचा अवघ्या ३,४०० रुपयांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.