Bhandara Crime News: भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळमोह परिसरात घडलेल्या सामूहिक अत्या
चार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी गोंदिया पोलिसां
नी शुक्रवारी दिवसभर भंडाऱ्यात तळ ठोकला
भंडाराः दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा भयंकर घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मदतीच्या बहाण्याने एकाच महिलेवर दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कन्हाळमोह परिसरात ४५ वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला आहे. महिलेची प्रकृती बिकट असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (bhandara gang raped)
अत्याचार पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे पतीने नांदवायला नकार दिल्यानंतर पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. मात्र, तिथेच घात झाला. मदतीच्या बहाण्याने एका कारचालकाने तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.