१६६ नंबरची ती मुलगी जिचा फोटो खिशात घेऊन फिरायचा पोलीस अधिकारी, अखेर ९ वर्षांनंतर आले यश

KolhapurLive

 

अंधेरी पश्चिम येथील कर्नाटक मिलन वेल्फेअर सोसायटीमध्ये राहणारी पूजा गौड जानेवारी, २०१३मध्ये शाळेसाठी घराबाहेर पडली, ती परतलीच नाही. शाळेमध्ये

 मैत्रिणींकडे चौकशी




मुंबईः सात वर्षांची मुलगी साधारण नऊ वर्षानंतर मुंबईतून बेपत्ता झाली होती. मुंबई पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला असून गुरुवारी तिच्या आई- वडिलांकडे तिला सुपूर्द करण्यात आलं आहे. शाळेजवळून पूजाचे अपहरण करणाऱ्यासही डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली.

डीएन नगर पोलीस स्थानकातील फाइलमध्ये पूजा १६६वी बेपत्ता अल्पवयीन मुलगी असल्याची नोंद होती. २०१३ला पूजाचे अपहरण झाले होते. मात्र, २०१५पर्यंत पोलीस तिचा शोध घेऊ शकले नाहीत. तेव्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी अधिकारी, सहायक उप निरीक्षण राजेंद्र भोसले सेवानिवृत्त झाले. मात्र, तरीही त्यांनी पूजाचा शोध सुरूच ठेवला. भोसले गावाहून मुंबईला येतानाही पूजाचा फोटो घेऊन फिरत असतं. पूजा जिवंत आहे आणि ती लवकरच सापडेल, अशी माझी खात्री होती. मी जेव्हा पण मुंबईला यायचो तेव्हा मी तिचा शोध घ्यायचो, असं भोसले यांनी म्हटलं आहे.

पूजाचा शोध घेण्यासाठी ते हजारो घरात गेले. कितीतरी स्त्रोत वापरले. मात्र, यश मिळालं नाही. चार दिवसांपूर्वीच भोसले यांनी माहिमच्या दर्गामध्ये नमाज अदा केली होती. तसंच, गावाला जाण्याआधी त्यांनी पूजाच्या आईचीही भेट घेतली होती. पूजा बेपत्ता होण्यापूर्वी तिची भाऊ रोहित याच्यासोबत भेट झाली होती.

पूजा अंधेरीला असलेल्या आमच्या शाळेजवळ बसली होती. तेव्हा तिने माझ्यासोबत घरी यायला नकार दिला होता. आमच्या आजोबांनी आम्हाला १० रुपये खाऊसाठी दिले होते. तिला तिच्या हिस्स्याचे ५ रुपये हवे होते. पण मी तिला शाळा सुटल्यावर तुला तुझ्या हिस्स्याचे पैसे देईन असं सांगितलं. मात्र ती काहीच बोलली नाही, अशी आठवण रोहितने सांगितली.

अपहरकर्त्यांनी पूजाला आइस्क्रीमचे लालुच दाखवून तिचे अपहरण केले. तेव्हा आरोपी हॅरी डिसोझा आणि त्याच्या पत्नीला मुलबाळ नव्हते आणि म्हणून त्यांनी पूजाला मुलगी म्हणून ठेवून घेतले. तिचे नाव बदलून अॅनी ठेवले. तीन वर्षांनंतर डिसोझा दाम्पत्याला मुल झाल्यानंतर पूजाला मारहाण करायला सुरुवात केली. घरातली सगळी कामं ते पूजाकडून करुन घ्यायचे. तिला दुसरीकडेही काम करायला भाग पाडत होते. व मारहाण करुन तिच्याकडून तिचे कमाईचे पैसे काढून घेत होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद कुरडे यांना विलेपार्ले येथील झोपडपट्टीमध्ये एक मुलगी राहत असून, तिचे आई-वडील तिला नीट वागणूक देत नसल्याचे समजले. काही तरी संशयास्पद वाटत असल्याने कुरडे यांनी कॉन्स्टेबल संदीप डांगे याना नेहरूनगर झोपडपट्टीमध्ये पाठविले. त्यांनी या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. आपल्या पोलिस ठाण्यातील हरवलेल्या मुलांच्या नोंदी; तसेच मिसिंग ब्युरो अॅपवरही शोधले असता ही मुलगी पूजा गौडप्रमाणे दिसत असल्याचे वाटले. पोलिसांनी खात्री करण्यासाठी तिच्या आई-वडिलांना बोलावले. ही पूजाच असल्याचे त्यांनी सांगताच पोलिसांनी हॅरी डिसोझा याला ताब्यात घेतले.