काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. ८ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर मोर्चा काढायला लागेल असं पाटील म्हणाले. तसंच कोल्हापुरातील इतर प्रश्नांवर देखील सतेज पाटील यांनी भाष्य केलं. राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असं ते म्हणाले. आम्ही सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेत असतो असं पाटील म्हणाले.