मेडल्सचा डबल धमाका... ज्युदोमध्ये भारताला दोन पदकं; सुशीलादेवीला रौप्य, तर विजयला कांस्य

KolhapurLive

 

सुशिलादेवीने ४८ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशिलादेवीने रौप्यपद

क पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशिलादेवीने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावले आहे. यावेळी

 सुशिलादेवीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. भारताच्या विजय कुमार यादवने ६० किलो वजनी गटात यावेळी

 कांस्यपदकाची कमाई केली आहे.




बर्मिंगहम : भारताने आज ज्युदोमध्ये डबल धमाका केल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या सुशिलादेवी लिकमाबाने ४८ किवो वजनी गटामध्ये रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर भारताने अजून एक पदक आज ज्युदोमध्ये पटकावले. भारताच्या विजय कुमार यादवने ६० किलो वजनी गटात यावेळी कांस्यपदकाची कमाई केली आहे.

भारताला आज ज्युदोमध्ये एकतरी सुवर्णपदक मिळावे, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण भारताला आज ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी त्यांनी दोन पदकांची कमाई केली आहे. सुशिलादेवीने ४८ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशिलादेवीने रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशिलादेवीने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावले आहे. यावेळी सुशिलादेवीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा सुशिलादेवी दमदार कामगिरी करेल, असे वाटले होते. त्यामुळेच तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. सुशिलादेवीचा अंतिम फेरीतील सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेलाबरोबर होणार आहे.

सुशिलादेवी आणि मिचेला यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पण या सामन्यात सुशिलादेवीवर मिचेला भारी पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सुशिलादेवीच्या हातून सुवर्णपदक निसटले आणि तिला रौप्यपदक मिळवता आले. मिचेलाने या सामन्यात अनुभव पणाला लावला आणि सुशिलादेवीवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.

सामन्याच्या सुरुवातीलाच विजय कुमार हा आक्रमक खेळ करत असल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या पाच सेकंदांमध्येच त्याने जोरदार चाल खेळली आणि तिथेच आता विजय कुमार पददक पटकावणार हे जळपास निश्चित झाले होते. एकामागोमाग एक भारतासाठी ज्युदोमध्ये हे दुसरे पदक आले होते. विजय कुमारने कांस्यपदकाच्या सामन्याच्या सुरुवातीच्याच मिनिटाला पेट्रोस क्रिस्टोडॉलिड्सची झटपट कामगिरी करून भारताला पदक मिळवून दिले. विजय कुमारने बेल वाजवण्याच्या अवघ्या ५ सेकंदांनंतर वाजा-अरी जिंकली आणि पुरुषांच्या ६०0 किलो ज्युडो स्पर्धेत इप्पोनला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी दावेदारी स्पष्ट केली.