मराठी मनोरंजनसृष्टीसह हिंदीतही काम करत अमृता खानविलकरनं स्वतःची ओळख निर्माण केली. ग्लॅमरपलीकडे जात तिच्यातल्या
अभिनेत्रीला आव्हान देणारी भूमिका एका तपानंतर तिला मिळाली. या भूमिकेनं तिच्यातल्या अभिनेत्रीचं कौतुक झालं, याचा तिला आनंद
वाटतो.
‘बारा वर्षांच्या करिअरमध्ये ‘चंद्रमुखी’च्या निमित्तानं मला ‘शीर्षक भूमिका’ मिळाली. दिग्दर्शक प्रसाद ओककडून मला ही कादंबरी मिळाली तेव्हा मी ती दीड दिवसांत वाचली होती. तेव्हा आम्हा दोघांव्यतिरिक्त कुणी नव्हती. मी लंडनला ‘वेल्डन बेबी’चं चित्रीकरण करायला गेले होते. तिथं अक्षय बर्दापूरकर भेटले आणि पुढचं काम सुरू झालं. विश्वास पाटलांकडून हक्क घ्यायला गेलो तेव्हा अजय-अतुलनं संगीत करावं अशी त्यांची अट होती. त्यानंतर या संगीतकारद्वयीशी बोललो आणि काम सुरू झालं. लॉकडाउन आल्यानं काम बंद होतंय की काय असं वाटलं, मात्र निर्मात्यांमुळे हे काम पूर्णत्वास केलं. पहिला लॉकडाउन संपल्यावर आणि दुसरा सुरू होण्यापूर्वी हे काम संपलं. एखादी भूमिका, एखादं काम तुमच्याकडे येणार असतं तशी ही शीर्षक भूमिका मला मिळाली,’ असं अमृता सांगते.
१२ वर्षांच्या कारकिर्दीत शीर्षक भूमिका मिळायला फार वेळ लागला असं वाटतं?
- योग्य भूमिका योग्य वेळी योग्य कलाकारापर्यंत पोहोचते, यावर माझा ठाम विश्वास होता. कलाकार म्हणून तुमची ओळख निर्माण होण्यापासून एखाद्या भूमिकेसाठी तुम्हीच योग्य आहात, हा विश्वास निर्माण होण्यापर्यंत काही काळ जावा लागतो. हे ‘चंद्रमुखी’च्या निमित्तानं घडलं याचा आनंद आहे. चाहत्यांकडून जी दाद आणि प्रतिसाद मिळाला आजही मिळतोय, त्याचा आनंद वाटतो. अभिनेत्री म्हणून आता कुठं करिअर सुरू होतंय याची जाणीव झाली. जी संधी मिळाली त्यात मी जीव ओतला. आता मला कळू लागलं आहे, की कोणते चित्रपट करायचे आहेत आणि प्रेक्षकांना कोणत्या भूमिकांमधून आपण भेटायचं आहे.